कुंड पर्यटन स्थळ निघोज - टाकळी हाजी निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार . निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण अविष्कार - रांजणखळगे
Aditya निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार - रांजणखळगे निघोज आणि टाकळी हाजी हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्यी सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सिमेवरील तसेच पुण्यापासुन 75 कि.मी व अहमदनगर पासून 70 कि.मी.अंतरावर असलेल्या टाकळी हाजी , निघोज येथील, कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे असंख्य खड्डे तयार झालेले आहेत तेच रांजणखळगे. नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरशः विस्मयकारी चमत्कारच आहे. ह्या खड्डयांचा आकार रांजणासारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुद्धा आटत नाही. अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ह्या कुंडांची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. कुकडी नदीच्या पात्रात साधारण 200 मीटर ल...